andhralekha
Welcome
Login / Register

Kothimbir Vadi | घरगूती कोथिंबीर वडी | खुशखुशीत झटपट कोथिंबीर वडी आता वेगळ्या पद्धतीने तयार करा

Your video will begin in 30
You can skip to video in 3

Thanks! Share it with your friends!

URL

You disliked this video. Thanks for the feedback!

Sorry, only registred users can create playlists.
URL


Added by svrsprabhu in Cookery Receips
9 Views

Description

Kothimbir Vadi | Homemade Easy Recipe | Monsoon Special Recipe | Quick & Different Way

साहित्य - एक मोठी जूडी कोथिंबीर, १ tea spn हिंग, १ tbl spn जीरे, १ tea spn हळद, २५० ग्रॅम बेसन ( चण्याचं पीठ ), एक वाटी तांदळाचे पीठ, ½ tbl spn धणे पावडर, एक वाटी ओल्या नारळाचा खीस, हिरवी पेस्ट ( ४ हिरव्या मिरच्या, १५ लसूण पाकळ्या, १ इंच आले ) ½ tbl spn खसखस, ४ tbl spn सफेद तीळ, २ tbl spn तेल आणि तळण्याकरिता तेल वेगळे, चवीनुसार मीठ.

कृती - कोथिंबीर स्वच्छ करून बारीक चिरून घ्यावी. एका पातेल्यात १½ ग्लास पाणी उकळून घ्या. पाणी उकळल्या नंतर त्यात हिंग, जीरे, हळद, चण्याचं पीठ, तांदळाचे पीठ, धणे पावडर, ओल्या नारळाचा खीस, हिरवी पेस्ट, खसखस, थोडे सफेद तीळ, २ tbl spn तेल आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण चांगले घटघटित एकजीव करा. एकजीव करून झाल्यानंतर एका खोलगट थाळीवर थोडे तेल टाकून सर्व बाजूने चोळून घ्या. आता गरम मिश्रण थाळीवर घालून सर्व बाजूने पसरवा. वरून तीळ घाला. आता कोथिंबीर वाडीच्या मिश्रणाला अर्थात या थाळीला २ तास चांगले थंड करून घ्या. मिश्रण थंड झाल्यानंतर त्याच्या आवडीनुसार वड्या पाडून घ्या. आता वड्या मंद आचेवर तेलात सोनेरी रंगापर्यंत तळून घ्या. खुसखुशीत कोथिंबीर वड्या शाकाहारी जेवणासोबत किंवा सकाळच्या नाश्त्या सोबत गरमागरम वाढा. धन्यवाद !

Post your comment

Comments

Be the first to comment
RSS